Nagpur news | राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सूरु

0
40

Nagpur news : राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षभरात वादात सापडलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सोबतच राज्यात काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचालींना वेग आल्याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुख असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचीही बदली होणार असल्याची माहिती मिळत आहे.(Big News)

Gold Price:मोठी बातमी!सोने 7 महिन्यांच्या नीचांकावर,भाव अजुन कमी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते.आयोगाचे नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता.मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेनुसार शासनाने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्याचे प्रमुखपद रिक्त होताच नवे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्य पोलीस दलाचा कारभार हाती घेताच रश्मी शुक्ला या आगामी निवडणुकांचे हवा लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत प्राधान्य देण्याची शक्यता आहे.यामुळे राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

कोण असणार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त?
अमितेश कुमार यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी नागपुरात झाल्यामुळे त्यांची बदली होण्याचे निश्चित समजले जात आहे. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे नवे आयुक्त म्हणून पहिल्या क्रमांकावर गृहविभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार सिंह यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्य राखीव दलाचे प्रमुख चिरंजिवी प्रसाद आणि राज्य वाहतूक विभागाचे अपर महासंचालक रवींद्र सिंघल यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे.

ACBचे महासंचालक पद नक्की रिक्त का?
राज्य पोलीस दलात ९ पोलीस महासंचालकांची पदे मंजूर आहेत. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) या महत्वाच्या पदासह लीगल टेक्निकल आणि सिव्हिल डिफेन्स पदे रिक्त आहेत. राजकीय दबावापोटी एसीबीचे महासंचालक पद रिक्त ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ठाण्यात आयुक्त म्हणून वर्णी लागल्यास जयदीप सिंह यांची एसीबीच्या प्रमुख पदावर बदली होण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here