Big News | महाराष्ट्रातील राज्य-सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी मोठी बातमी आहे. लवकरच महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. (WRD Maharashtra Recruitment 2023)
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच दि. 03 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. तर हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 4 हजार 497 पदं भरली जाणार आहे. परंतु, पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
JEE Main 2024 Updates | सत्र 1 साठी कसा करावा अर्ज? जाणुन घ्या संपुर्ण माहिती
कोणत्या पदांसाठी होणार भरती ?
- वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित),
- निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित),
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क),
- भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क),
- आरेखक (गट-क),
- सहाय्यक आरेखक (गट-क),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क),
- प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क),
- अनुरेखक (गट-क),
- दप्तर कारकुन (गट-क),
- मोजणीदार (गट-क),
- कालवा निरीक्षक (गट-क),
- सहाय्यक भांडारपाल (गट-क),
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).
शैक्षणिक पात्रता | पोस्टनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यासाठी कृपया जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
परीक्षा शुल्क (फी) | खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी- ₹.१०००/-,
मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-.
विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पगार |
- वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
- निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
- भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
- आरेखक – 29,200/- ते 92,300/-
- सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
- प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
- अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
- दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
- मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
- कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
- सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम