Big news | मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ८ जणांचा मृत्यू; तर सर्व सेवा विस्कळीत

0
17

Big news |  दक्षिण भारतात मिचॉन्ग (Michaung) चक्रीवादळाचा कहर दिसून येत आहे. तामिळनाडू राज्यात यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. बंगालच्या उपसागरातून २ डिसेंबर रोजी तयार झालेल्या ह्या मिचॉन्ग चक्रीवादळ हे आज देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकणार आहे. (Big news)

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळामध्ये रुपांतर झालेलं असून, आंध्र प्रदेश व ओडिशा राज्याच्या किनारी भागात या चक्रिवादळाचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हे मिचॉन्ग (Michaung) चक्रीवादळ हे (दी. ५ डिसेंबर) रोजी किनारपट्टीला धडकणार असल्याने चेन्नई व इतर ठिकाणी मोठ्या स्वरुपात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ग्रेटर चेन्नई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्या चक्रीवादळामुळे झाड पडणे, वीज कोसळणे यासारख्या अनेक कारणांमुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग ह्या चक्रीवादळाची तीव्रता हि मंगळवार (दी. ५ डिसेंबर) रोजी आणखी वाढणार असल्याचीही माहिती मिळत आहे. तसेच, हे वादळ नेल्लोर व मछलीपट्टणम यादरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशाराहि यावेळी हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

चेन्नईत पावसाचा जोर 

पीटीआयच्या माहितीनुसार,  चेन्नईमध्ये  बहुतांश भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. येथील सखल भागात मोठा पूर आल्याचेही बघायला मिळत आहे.  चेन्नईमध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून, या पावसामुळे चेन्नई मधील सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सहा गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना रक्कमेचा परतावा मिळणार असल्याचेहि दक्षिण रेल्वेने जाहीर केलेले आहे. चेन्नई येथील विमानतळावरील धावपट्टीवरहि पाणी साचल्याने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणंदेखील रद्द करण्यात आलेली आहेत. सोबतच अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही बंगळूरच्या दिशेने वळवण्यात आली आहेत. दरम्यान, चेन्नई येथील विमानतळावरील धावपट्टी ही मंगळवार (दी. ५ डिसेंबर) रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

Big breaking | मोठी बातमी..! राजपूत करणी सेना अध्यक्षाची गोळी झाडून हत्या

हवामान विभागाचा अलर्ट

तामिळनाडू, चेन्नई तसेच ओडिशा ह्या किनारी भागातील नागरिकांना व मच्छीमारांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चेन्नईमध्येही आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशमध्येदेखील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चेन्नईमध्ये ताशी १३ किमीच्या वेगाने वारे वाहत आहेत. ह्या चक्रीवादळामुळे येत्या काही तासांतच वाऱ्यांचा वेग हा वाढणार असून, ७५ किमी प्रतितास ह्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही आयएमडीने वर्तविलेला आहे. (Michaung)

मिचॉन्ग चक्रीवादळाचा मोठा धोका

दक्षिण-पश्चिम ह्या बंगालच्या उपसागरावरील मिचॉन्ग चक्रीवादळ हे गेल्या सहा तासांत १३ किमी प्रतितास या वेगाने उत्तर-वायव्य ह्या दिशेने पुढे सरकलं आहे. ३ डिसेंबरला रात्री ११.३० वाजता हे चक्रीवादळ अक्षांश १२.८°N व रेखांश ८१.६°E जवळ केंद्रीत झालेलं होतं. हे क्षेत्र पुद्दुचेरीपासून सुमारे २१० किमी पूर्व-ईशान्य, चेन्नईच्या १५० किमी पूर्व-आग्नेय तर, नेल्लोरच्या २५० किमी आग्नेय, बापटलापासून ३६० किमी दक्षिण-पूर्व व मछलीपट्टनमच्या ३८० किमी दक्षिण-पूर्वेस आहे.(Big news)

Maratha Reservation | मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here