Big News | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री यांनी पीएचडी संदर्भात कलेल्या वक्तव्यावरून राज्यभर वातावरण पेटलेलं आहे. राज्यातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात संतापल्याचं पहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक विधान केलं होतं ते म्हणजे पीएचडी करून काय दिवे लावणार? असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर संपुर्ण महाराष्ट्रातून टीकास्त्राला सामोरे जावं लागलं आणि त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या या विधानावर दिलगिरी व्यक्त केलेली आहे.
Beed Crime | शाळेत शिक्षिकांचे अश्लील कृत्य, घटनेमुळे विद्यार्थी हादरले
अजित पवारांनी कली दिलगिरी व्यक्त..
यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पावर म्हणाले की, पीएचडी संदर्भात मी काल जी भूमिका मांडली होती त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी याआधीही सभागृहात अशा भूमिका मांडल्या असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती तयार केली होती. या समितीने सारथी, महाज्योती, बार्टी कितीतरी विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे आणि याबाबत अभ्यासही करायला हवा. मला कुणावरही टीका करायची नाही मात्र काही लोक राजकीय नेत्यांवर पीएचडी करत असून पीएचडी एक महत्वाचा अभ्यासाचा विषय आहे तसेच त्यात खूप अभ्यासही करण्याची गरज असते.
Ajit Pawar | PHD करणं म्हणजे पक्ष बदलण्याइतकं सोपं नाही; विद्यार्थ्यांनी दादांना सुनावलं
Big News | “तरूणांनी कौशल्यावर आधरित शिक्षण घ्यावं”
काही लोकांनी पीएचडी व्हावं तसेच काही लोकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावं. अशा संबंधित पाएचडीवर ट्रेनिंग दिल्यास नोकरी नक्की मिळू शकते. जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर-फिटर अशा प्रकारची कामं तिकडे करता येऊ शकतात. तिथे चार लाख मुला-मुलींची गरजही आहे मात्र त्यासाठी जर्मन भाषा यायला हवी. त्यासाठी जर्मन भाषा तरूणांनी शिकावी आणि यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. ज्या मुलांना परदेशात नोकरी करावी वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असंही अजित पवार म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम