Big breaking | राजस्थानच्या जयपूरमध्ये ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी’ सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ह्या गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांवरही गोळ्या झाडल्या आहेत.
दरम्यान, दोघ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत.(Big breaking)
श्याम नगर पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेत. श्याम नगरमध्ये ही थरारक घटना घडली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या निवासस्थानी होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.(Big breaking)
Maratha Reservation | मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन
लॉरेंस बीश्नोई गँगच्या संपत नेहरा याच्याकडून सुखदेव सिंह यांना आधी धमकी देखील मिळालेली होती, असं सांगितलं जात आहे. हि धमकी मिळाल्यानंतर सुखदेव यांनी जयपूर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार हि नोंदवली होती. आरोपींनी सुखदेव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आहेत.
दरम्यान, आरोपी हे दोन स्कुटीवरुन आले होते. ते चौघेजण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम नगरच्या एका रस्त्यावर सुखदेव सिंह गोगामेड़ी हे मंगळवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास घराबाहेर उभे होते. त्यावेळीच ह्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
गोगामेड़ी यांना लगेच जवळच्या मेट्रो मास ह्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. मेट्रो मास हॉस्पिटल बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.(Big breaking)
Agriculture News | साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम