महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात म्हणजेच मायदेशी आणली जाणार आहेत. हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उभी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला आहे. तसेच, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेली आहे. परंतु, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलेलं आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबतच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Nashik | तहसीलदारपदाचा राजीनामा; निवडणुक लढवण्याची तयारी ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवलेला आहे. भारत-पाकि सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानाला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.’
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले होते. महाराजांची वाघनखे आहेत, त्याला इतिहासही आहे. ती वाघनखं आपल्या देशात तसेच आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आहे. अगदी प्रत्येकाला हेवा वाटावा असं देशासाठी अभिमानाचं काम आहे. पण दुसरीकडे काही लोक ज्यांना विरोध, द्वेष, मत्सर सरकारच्या प्रत्येक कामावर व्यक्त करत असतात. त्यांनीच वाघनखांबाबत आक्षेप व्यक्त केलेला आहे. शंका व्यक्त केलेली आहे. हे सगळं दुर्दैवी आहे पण हे शंका व्यक्त करणारे लोक आहेत. त्या लोकांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसत आहोत. सांस्कृतिक कार्य विभाग काम करेल आणि वाघनखं येतील तसेच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
PSI Exam | पीएसआय पदासाठी रविवारी होणार लेखी परीक्षा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम