Mumbai | ED पासून वाचण्यासाठी सत्तेत गेले भुजबळ; अंजली दमानिया यांचे प्रत्युत्तर

0
19

Mumbai |  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फसवणुकीचे आरोप करत आहेत. छगन भुजबळ यांच्या बंगल्याच्या जागेवरून त्यांनी हे आरोप केले आहेत.

अशात भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी काल पत्रकार परिषदेत दमानिया यांचे आरोप फेटाळले होते. मात्र, दमानिया ह्या त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.

परवेश कंपनी ही समीर भुजबळ यांची आहे. याच कंपनीने तिथं इमारत बांधलेली आहे. तेव्हा मी आरोप केले होते की, समीर भुजबळ यांनी ही जागा लाटली आहे. कालच्या पत्रकार परिषदेत समीर भुजबळ हे खोट बोललेले आहेत.

त्यांनी असंही सांगितलंय की, आम्ही २००३ मध्ये त्यांना पैसे देत होते. तेव्हा ह्या कुटुंबाने तेव्हा उत्तर दिलं नाही. काल समीर भुजबळ हे सांगत होते की, आम्हाला सहनभूती वाटत होती. म्हणून आम्ही त्यांना पैसे देत होतो. मग कधी हे पैसे त्यांनी दिले? असं अंजली दमानिया या म्हटल्या आहेत.

Marathwada | जायकवाडीला पाणी सोडावे यासाठी आंदोलन; मा. मंत्री राजेश टोपेंना अटक

समीर भुजबळ म्हटले की, अंजली दमानिया बाई ह्या सुपारीबाज आहे. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा नवरा हा खूप चांगलं कमावतो व टॅक्सही भरतो तुमच्यासारखं नाही. तुम्ही सुपारीबाज लोक आहात. तुमच्या विरोधात कधीच एफआर व्हायला पाहिजे होती. माझ्यासोबत आलेल्या या भगिनीचा तो बंगला आहे. तो यांच्या वडिलांचा होता आणि त्यांना तीन मूलं होती.

पुढे पॉवर ऑफ एटॉर्नीमध्ये यांच्यावर सगळे होल्ड आलं, असं दमानिया यांनी यावेळी सांगितलं आहे. काल समीर भुजबळ सांगत होते की, आम्हाला सहनभूती वाटत होती म्हणून आम्ही त्यांना पैसे देत होतो. मग कधी पैसे दिले? तुम्ही यांना ५ फ्लॅटही देणार होते. तेही अजून का दिले नाहीत? तुम्हाला ती इमारत हडप करायची होती तुम्ही फक्त वाट बघत होते.

२०१६ मध्ये यांनी मला कोर्टात हे सर्व सांगितलं. तुमच्यासारखे लोक हे कोणत्याही पक्षात जातात व ED पासून वाचतात. तुम्ही अजित पवार, सुनील तटकरे हे सगळे लोक सत्तेसाठी युतीत गेलेले आहात, असा सणसणीत आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला आहे.

Nashik News | नामपूर मधील स्मशानभूमीत आढळले करणीचे साहित्य आणि तरुणांचे फोटो


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here