(Bhivandi accident) : राज्यामध्ये अपघातांच सत्र थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर नुकताच एक भीषण अपघात झाला असून यात एका भरधाव कंटेनरने काळ्या पिवळ्या टॅक्सीला जोरदार धडक दिल्याने सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील खडवली गावाजवळ घडली आहे.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणी दररोजच अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना आज काही आठ वाजेच्या सुमारास भिवंडी तालुक्यात असलेल्या खडवली गावाच्या क्रॉसिंग जवळ घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावरील खडकवली फाट्याजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी प्रवाशांना घेऊन निघाली होती. सकाळी आठ वाजेच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलर ने टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये टॅक्सी सुमारे 60 ते 70 फूट दूरवर फेकली गेली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
https://thepointnow.in/kirit-somayya-viral-video/
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सहा प्रवासी गंभीर जखमी असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
*अपघातात मृत झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे*
चिन्मय विकास शिंदे वय 15, प्रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंगळे वय 27, संतोष अनंत जाधव वय 50, वसंत धर्मा जाधव वय 50, प्रज्वल शंकर फिरके अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर दिलीप कुमार विश्वकर्मा वय 29, चेतना गणेश वय 19, कुणाल ज्ञानेश्वर भरमे वय 22 (इतर नावे माहीत नाही) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून अंगावर शहारा आणणारा दृश्य या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघायला मिळत आहे. दरम्यान या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलीस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम