Skip to content

आज पासून महाराष्ट्रात “भारत जोडोला” सुरुवात


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ ही यात्रा सोमवारी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेचे स्वागत व यात्रेदरम्यानच्या अन्य कार्यक्रमांची काँग्रेसतर्फे जोमाने तयारी झाली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. राज्यामध्ये १४ दिवस ही यात्रा चालेल.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत या यात्रेसंदर्भात माहिती दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान, हुसेन दलवाई, महिमा सिंग, मोहन जोशी, सचिन सावंत आदी उपस्थित होते. ही यात्रा सध्या तेलंगणात असून सोमवारी सायंकाळी साडेसातला देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देगलूर, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांतून ही यात्रा मध्य प्रदेशामध्ये प्रवेश करेल.

यात्रेच्या स्वागतासाठी कर्नाटक, तेलंगणच्या सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगरी सज्ज झाली आहे. सुरक्षा व अन्य तयारी पूर्ण झाली आहे. प्रवेशापूर्वीच्या पूर्वसंध्येसाठी, आज सायंकाळी शहराच्या प्रवेशद्वारासह शहरात सर्व ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. खासदार राहुल गांधी सोमवारी देगलूरमध्ये मुक्कामी असणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!