डीजेपासून रहा सावध! मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालानंतर गूढ वाढलं

0
10

बुलढाणा | डीजेच्या आवाजात सुरु असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (दि. 6) नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीबाई भागातील 27 वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले. या युवकाच्या शवविच्छेदन अहवालावरील मत तज्ज्ञांनी राखून ठेवल्याने मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.
Train Accident |भीषण अपघात..! मालगाडी वर पूलावरून कोसळली कार

खामगाव शहरातील सतीबाई भागातील युवराज उर्फ नटवर सुरेश यादव या युवकाला सोमवारी रात्री मिरवणुकीत नाचताना अस्वस्थ वाटू लागले होते. भोवळ येऊन कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी युवराजला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धावपळ केली. मातेर त्यांचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. कारण तोपर्यंत युवराजचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर युवराजचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. या युवकाच्या शवविच्छेदन अहवालावरील मत तज्ज्ञांनी राखून ठेवल्याने मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.

यापूर्वी नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीतही 4-5 युवक अशाच प्रकारच्या त्रासाने ग्रस्त

गणपती आणि नवरात्रीमध्ये पार पडलेल्या मिरवणुकांमध्ये डीजेवर वापरण्यात आलेल्या लेझर किरणांमुळे काही जणांना सोमवारी रातआंधळेपणाचा त्रास झाला होता. यापूर्वी नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीतही 4-5 युवक अशाच प्रकारच्या त्रासाने ग्रस्त होऊन उपचारासाठी आल्याची खामगावात चर्चा आहे. डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे घटनास्थळीच युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. दरम्यान या काळात अनेकांना भोवळ आल्याचा दावाही परिसरात केला जातो आहे.

Rain Update | शेतकऱ्यांसमोर संकट; राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता
खामगाव शहरात डीजेमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं निवेदन मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांनी (दि. ७) नोव्हेंबर रोजी दिलेले आहे. या निवेदनावर मुख्य रस्त्यावरील विविध प्रतिष्ठानच्या संचालकांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here