Beed Sabha | मराठ्यांनो तयारीला लागा…!; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

0
48
Beed Sabha
Beed Sabha

Beed Sabha | बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा सुरु होती यातच मनोझ जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमला असून मराठा आरक्षण आता कसं आणायचं ते फक्त बघाच, मराठा आरक्षण मिळवणारच असा इशारा मनोज जरांगे  यांनी दिला आहे.

छगन भूजबळ यांची अब्रुच काढली…

बीडमध्ये आलेला मराठांच्या एकजुटीचा हा महाप्रलय पाहून येवल्याच्या येडपटाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही असं म्हणत जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता सडकून टीका करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज आतापर्यंत शांत आहे पण सरकारने झोपू नये. ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? असा सवाल करत जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर तुफान फटकेबाजी केली.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे, कुणी म्हणतंय आमची घरं जाळली, तर कुणी म्हटलं हॉटेल जाळली आणि आपल्यावर खोटे आरोप करण्य़ात आले. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, तो समाज कुणाची घरं कशाला पेटवेल? यांच्याच लोकांनी हॉटेलं जाळली आणि नाव मराठा समाजाचं घातलं. सरकारही यांचंच ऐकतंय. माझ्या मराठा समाजाने शांतता काय असते हे दाखवून दिलं आहे. आमच्यावर खोटा डाग लावला आहे. सरकार झोपु नका …माराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मारठ्यांना डाग लावू नका. आता सावध व्हा…जर त्या एकाचं ऐकून मराठा समजाला आरक्षण दिलं नाही तर सरकारला महागात जाईन असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला आहे.

Manoj Jarange: आयच यडपट बुजगावण कुठल…; जरांगेनी भुजबळांची अब्रूच काढली

Beed Sabha | २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण

पुढे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण होणार असून शांतेत आंदोलन करायचं पण मराठा आंदोलन घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा पुढील इशारा जरांगेंनी दिला असून सरकारला लाज वाटत नाही का? असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. २० जानेवारीला मुंबईमधील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असून आम्ही येतोय तुम्ही फट संडासाची सोय करा असा टोला जरांगेंनी लगावला आहे. तसेच मुंबईत जाताना हिंसा करायची नाही असं आवाहनही करण्यात आलं.

 

सरकार गांभिर्याने घेत नाही पण आता त्यांना…

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, आपण तेच घेणार असं मनोज जरांगे म्हणाले असून मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि मराठ्यांचे मुडदे पडत असताना यांनी त्याकडे पाहायचंही नाही, आता तसं करायचं नाही. सरकार गांभिर्याने घेत नाही पण आता त्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहेच असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांची मतं घेऊन त्या भुजबळासारख्यांना मोठं केलं जातंय आणि आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुडदे बघत बसताय असं मनोज जरांगें म्हणाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here