Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; दोन्ही गटांत राडा

0
42

Balasaheb Thackeray | मुंबईतील शिवतीर्थावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. काल ज्या प्रकारे नियोजन केलेलं होतं त्यात बदल करून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था शिवतीर्थावर वाढवण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शिवसैनिक शांततेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतील. त्यानुसार आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तशा प्रकारचे निर्देशही वेळोवेळी देत आहोत, अशी माहिती डीसीपी झोन ५ चे मनोज पाटील यांनी दिली आहे

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. आज बाळासाहेब ठाकरे यांचा ११ वा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर  शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये तूफान राडा झाला होता. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झालेला होता.

कांद्याने रडवलंच! इजिप्तकडून कांदा निर्यातीवर बंदी; स्थानिक बाजारपेठेत कांदा महागणार

दरम्यान, या प्रकरणामुळे शिवतीर्थावर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार…गद्दार…अशी घोषणाबाजी केली आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थ स्मृतीस्थळाच्या परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळावरुन बाहेर जाण्याची विनंती केली. पण, शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा तूफान राडा झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मोठा फौज फट तैनात केलाआहे.

OBC Sabha | जालन्यात आज ओबीसींचा एल्गार; या आहेत मागण्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here