शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 11 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना सांगितले. यासोबतच अपात्रतेच्या नोटीसच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या याचिकांवर न्यायालयाने उत्तरे मागितली.
यानंतर शिवसेनेच्या बंडखोर पक्षाचे नेतृत्व करत असलेले एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हा विजय आहे.
सुरक्षे संदर्भात सूचना
सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्या सुट्टीतील खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला 39 बंडखोर शिवसेना आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे निर्देश दिले. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या होत्या. या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली होती. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. उपसभापतींनी बंडखोर आमदारांना नोटीसला उत्तर देण्यासाठी आज सायंकाळपर्यंतची मुदत दिली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम