बाजार समिती निवडणुकीत ‘या’ उमेदवारांना धक्का अर्ज फेटाळले

0
6

देवळा: बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांपैकी (दि ५ ) रोजी झालेल्या छाननीत ग्रामपंचायत गटातील चार तर सोसायटी गटातील चार असे एकूण आठ अर्ज नामंजूर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निंबंधक सुजय पोटे यांनी दिली .बुधवार दि ५ बाजार समिती सभागृहात दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली .

जाणीव पतसंस्थेला मार्च अखेर ३५ लाख रुपयांचा नफा ; चेअरमन भाऊसाहेब पगार

सोसायटी गटातील भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील मोहनदास पवर्त गवळी यांच्या दोन्ही अर्जावर सूचक अनुमोदक एकच असल्याने त्यांचा एक अर्ज नामंजूर करण्यात आला . तर सोसायटीच्या सर्वसाधारण गटातील साहेबराव ठमनराव अहिरे यांच्या अर्जावर सूचक ,अनुमोदक यांची अंतिम मतदार यादीत नाव नसल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला . सुनील धर्मराज देवरे यांच्या दोन्ही अर्जावर सूचक ,अनुमोदक एकच असल्याने त्यांचा एक अर्ज नामंजूर करण्यात आला . विलास धोंडू आहेर यांच्या अर्जावरील सूचक ,अनुमोदक यांची नांवे मतदार यादीत नसल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला .

Indian Rupees: भारतीय रुपयाचे वाढते वर्चस्व! आता या देशासोबत भारतीय चलनात होणार व्यवसाय, जाणून घ्या

ग्रामपंचायत गटातून आर्थिक दुर्बल प्रवर्गातील मनोज गंगाधर आहेर यांच्या अर्जासोबत दुर्बल घटक असल्याचा दाखला नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला . तर सर्वसाधारण गटातील विमलबाई दादाजी मोरे यांच्या नांवे १० आर जमीन नसल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला . अनु . जाती जमाती प्रवर्गातील पूनम योगेश पवार व वैभव धर्मा पवार यांच्या अर्जासोबत १० आर जमीन असल्या बाबतचा पुरावा न जोडल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here