Political Breaking : बच्चू कडू यांनीच आपण मंत्रिपदावरचा दावा सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडलेला आहे. यात प्रहारचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळेल, अश्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
बच्चू कडू यांनी देखील आपल्याला मंत्रिपद मिळेल, असा विश्वास बोलून दाखवला आहे. पण अजित पवार भाजपसोबत जात सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत.
बच्चू कडू म्हणाले की,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अडचणीमध्ये आहेत. त्यात मंत्रिपदासाठी जोरदार ओढाताण सुरू आहे. त्यामुळे मी स्वतः मंत्रिपदावरचा दावा सोडत आहे, असं मी आज जाहीर करतो. मला दिव्यांग विभागाचं काम देण्यात आलं आहे. त्यामुळं मी मंत्रिपदावरचा दावा सोडला असून हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्रिपद द्या, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मग
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
मंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट करेन, असं बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. ती बैठक पूर्ण झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोमवारी बैठक झाली. त्यांनी सांगितलं की आपली मैत्री कायम राहीली पाहीजे. मुख्यमंत्री सध्या अडचणी मध्ये आहेत. मला दिव्यांग खाते दिले म्हणून मी मंत्रिपदाचा दावा सोडतोय. मी मंत्रिपदाचा दावा करणार नाही, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मी एकनाथ शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन – कडू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले आहे. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करेल असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.
https://thepointnow.in/kirit-somayya-wrote-letter-to-devendra-fadnavis/
बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकर करण्याची मागणी वेळोवेळी केली होती. त्यातच अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे आधीपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली होती.
दिवसागणिक बदलत्या या राजकारणाला कंटाळून आपण मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. पण त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता.
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी अखेर आपण मंत्रीपदावरचा दावा सोडत असल्याचं स्पष्ट केल आहे. यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या इतर आमदारांमध्ये देखील आता अस्वस्थता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम