Bachchu Kadu | बच्चू कडुंनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले ‘भिकार** योजना..’

0
39
Bachchu Kadu
Bachchu Kadu

Bachchu Kadu |   एकीकडे भाजपची आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोहिमा पक्षाकडून राबवल्या जात आहे. आजमितीस भाजपकडे राज्यातील सर्वात मजबूत पक्ष म्हणून बघितले जात असताना, सत्ताधारी गटातील महत्त्वाचे आमदार म्हणजेच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनीच आता मोदी गॅरंटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला सवाल केला आहे.

यासोबतच त्यांनी तब्बल दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहूनही भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल अशोक चव्हाण यांनाही खोचक सवाल केला आहे. “केंद्र सरकार हे अपयशी ठरत असून या भिकारचोट योजना बंद करा, अशी संतप्त टिका बच्चू कडू यांनी केली आहे. (Bachchu Kadu)

बच्चू कडू हे मध्यमांसोबत बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून बच्चू कडू यांनी मोदींना हा सवाल केला असून, हे शेतकरी आंदोलन चिघळू नये म्हणून केंद्र सरकारने काहीतरी निर्णय घेतले पाहिजे. अन्यथा आम्हीदेखील या आंदोलनात सहभागी होऊ, या शब्दात आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टींची गॅरंटी घेतली आहे. मग ते शेतकऱ्यांच्या हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत ? असा खोचक सवालही यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

BJP | जुन्या नेत्यांना डावलून नव्याने आलेल्यांना संधी; ‘हे’आहेत भाजपचे उमेदवार..?

Bachchu Kadu | केंद्र सरकार पूर्णपणे फेल

एवढेच नाहीतर, यावेळी त्यांनी सरकारवर जहरी टिका केली असून, ते म्हणाले की,”हे सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. मी जरी सरकारमध्ये आहे. तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिल्या नसून, या भिकारचोट योजना बंद करा व शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव द्या. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीये.  उलट त्यांचं व्याजही कापलं जात आहे. सरकारने ही डाकेखोरी आता बंद केली पाहिजे, असा हल्लाच आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर चढवला असून, आता बच्चू कडू यांच्या या टीकेमुळे राज्यच्या राजकारण ढवळून निघाले आहे. यातच बच्चू कडे हेदेखील सत्ताधारी गटात नाराज आहेत का? असा सवालही उपस्थित होत आहे. (Bachchu Kadu)

अशोकराव भाजपमध्ये का गेले..?

दरम्यान, एवढेच नाहीतर यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावरही टीका केली असून, “हे विकासाचं जाळ आहे, आणि त्या जाळ्यात ते अडकले आहेत. विकासाच्या या जाळ्यात अडकल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. अशोकराव चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ते आता भाजपमध्ये का गेले? तो संपूर्ण त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात हा भ्रम कायम आहे. त्यामुळे तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपमध्ये का गेले? ते स्पष्ट झालं पाहिजे, असं यावेळी आमदार कडू म्हणाले. (Bachchu Kadu)

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?

प्रहारलाच विरोधकांची भूमिका… 

राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांचना उधाण आले होते. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की,”आता कोण कोणत्या पक्षात विलीन होईल हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र, जर अशीच परिस्थिती राहिली तर प्रहारलाच आता विरोधकांची भूमिका पार पाडावी लागणार असल्याची टिकाही त्यांनी केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here