Baba Siddiqui | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात मोठा खुलासा झाला असून यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आले आहे. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी देखील हल्ले खोरांच्या निशाण्यावर असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
दोघांना एकत्र मारण्याच्या सूचना
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी चौकशी दरम्यान वेगवेगळे खुलासे केले असून त्यांनी केलेले खुलासे व्हेरिफाय करण्याचे काम मुंबई पोलीस करीत आहेत. झिशान सिद्दीकी हे बिश्नोई गॅंगच्या टार्गेटवर असल्याची माहिती यामधून समोर आली आहे. आरोपींनी पोलीसांना दिलेल्या जबाबात “दोघांना एकत्र मारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संधी न मिळाल्यास जो मिळेल त्याला मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना “दोन्ही म्हणजे वडील आणि मुलगा इथेच आहेत. माहिती आतल्या व्यक्तीने कॉल करून दिली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचून वाट पाहत होते. मात्र झिशान तिथून निघून गेले होते. पण बाबा सिद्दीकी तिथे असल्याने त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्यांना मारले” असा जबाब आरोपींनी पोलीस तपासा दिला.
पोलिसांकडून चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी
धर्मराज शिवा आणि गुरमेल अशी आरोपींची नावे असून शिवा आणि धर्मराज हे उत्तर प्रदेशातील बहराइचचे रहिवासी आहेत. या दोघांचा यापूर्वी गुन्हेगारीचा रेकॉर्ड नसून गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे. धर्मराज आणि गुरमेल यांना अटक करण्यात आली असून शिवा फरार असून त्यालाच हत्येचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. तर या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे नावही समोर आले असून मोहम्मद झिशान अख्तर हा देखील त्यांना सामील असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली असून या हत्तेबाबत दोन्ही आरोपींची अनेक पैलूंवर चौकशी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत 14 दिवसांची रिमांड गरजेची असते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम