सीमा हैदरच्या ‘KARACHI TO NOIDA’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

0
19

Karachi to Noida | ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत त्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा ट्रेलर आता समोर आलेला आहे. सीमा हैदर हा चित्रपटाचा मध्यबिंदू आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदरवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आलेले आहे. टीव्ही-मनोरंजन क्षेत्र असो किंवा सोशल मीडिया या सगळ्यांना सीमा हैदर नावाच्या व्यक्तीनं भुरळ घातलेली होती. बॉलीवूडच्या मेकर्सला सीमा हैदर या विषयावर चित्रपटाची निर्मिती करावी असं वाटलं आणि त्यांनी ‘कराची टू नोएडा’ नावाच्या चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि आता त्याचा ट्रेलर समोर आला असून त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.

अवकाळीचा तडाखा बसलेल्या बागलाण तालुक्यांत यंदा दुष्काळ; 8 तालुक्यांचा दुष्काळाशी सामना

सीमा हैदर नेमकी कोण आहे ?

सीमा हैदर ही तिच्या प्रेमासाठी पाकिस्तानामधुन भारतात आल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे सीमा हैदर ही खरचं सामान्य मुलगी आहे की ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. दोन आठवड्यांहून अधिक काळ सीमा ही बातम्यांचा विषय बनली होती. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना देखील उधाण आलेले होते. आता सीमा हैदरच्या आयुष्यावर आधारित आलेल्या चित्रपटानं अनेकांचे लक्ष वेधले गेलेलं आहे. सीमा पाकिस्तानमधून का आली आहे? तिच्या भारतात येण्यामागील उद्देश काय आहे? याचा शोध अजूनही सुरु आहे. असे त्या ट्रेलरमध्ये योगी आदित्यनाथ सांगत आहेत. दुसरीकडे लालुप्रसाद यादव हे देखील एका न्युज चॅनेलमध्ये डिबेटमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे ‘KARACHI TO NOIDA’ हा चित्रपट राजकीय चित्रपट म्हणूनही ओळखला जाणार आहे.

Shirdi| मोदींच्या शिर्डीतल्या जनसभेला जाणाऱ्या बसची तोडफोड…मराठा आंदोलक आक्रमक…

सीमा हैदर जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या. पोलिसांनी जो तपास केला त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे भारतीय इंटेलिजन्सकडून तपास सुरु करण्यात आल्याची माहितीही समोर आलेली आहे. सध्या सीमा ही ग्रेटर नोएडामध्ये तिच्या सासरच्या लोकांसमवेत राहते.  सीमाची आणि सचिनची ओळख पब्जी या गेमच्या माध्यमातून झाली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here