Assembly Election | नाशकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू; आज ‘या’ दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

0
51
#image_title

Assembly Election | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बुधवार दि. 23 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील 4 मतदारसंघातून 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कळवण मधून मापककडून जे. पी. गावितांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून बाकी उमेदवार अपक्ष आहेत. तर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशी अर्जाची विक्री जोरात झाली आहे. यामध्ये हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, वसंत गीते आदींचा यात समावेश आहे.

Assembly Election | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर

15 जागांकरिता रणसंग्राम सुरू

नाशिक जिल्ह्यात 15 जागांकरिता रणसंग्राम सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 4 मतदारसंघातून 6 उमेदवारांनी 8 अर्ज दाखल केले. अर्ज भरणाऱ्यांमध्ये गावित यांचा मुख्य समावेश असून निफाडमधून सुनिल लगड व देवराम जाधव तसेच दिंडोरी मधून हिरामण गांगोडे व काशिनाथ वाटाने यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर नांदगावात अपक्ष भगवान सोनावणे यांनी अर्ज भरला आहे. जिल्ह्यात मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 2 दिवसात 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

अनेक दिग्गजांनी खरेदी केले अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गजांनी अर्ज खरेदी केली असून नाशिक शहरातील पूर्व, मध्य, पश्चिम, देवळाली तसेच इगतपुरी या 5 मतदारसंघात 133 अर्जांची खरेदी झाली. अद्वय हिरे मालेगांव बाह्य ठाकरे गट, धनराज महाले दिंडोरी शिंदे गट, नरहरी झिरवाळ दिंडोरी अजित पवार गट, छगन भुजबळ येवला अजित पवार गट या दिग्गजांनी आज अर्ज दाखल केले आहेत. तर अन्य मतदारसंघात नामनिर्देशनपत्र खरेदीसाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. दरम्यान, गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे बहुतांश इच्छुकांनी या मुहूर्तावर फॉर्म भरण्याची तयारी केली आहे.

दुसऱ्या दिवशी 22 उमेदवारांनी 40 अर्ज नेल्याची माहीती

तर नाशिक मध्य मतदार संघात चुरस पहायला मिळत असून येथून दुसऱ्या दिवशी 22 उमेदवारांनी 40 अर्ज नेले असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने आमदार देवयानी फरांदे, भाजपचे सुरेश पाटील, ठाकरे गटाचे वसंत गीते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रंजन ठाकरे, काँग्रेसचे राहुल दिवे आणि मनसेचे स्वाती जाधव आणि अंकुश पवार यांचा समावेश आहे. तर नाशिक पूर्व मतदारसंघात दिवसभरात 14 उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली असून भाजपचे उमेदवार आमदार राहुल ढिकले यांच्यासह, बाळासाहेब सानप, निर्भय महाराष्ट्र जितेंद्र भावे, मनसेचे रोहन देशपांडे, शरद पवार गटाच्या पुनम महाले, बसपाचे प्रसाद जायखिंडीकर यांचा समावेश आहे.

Assembly Election | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिकमधून कोणाला मिळाली संधी??

तर नाशिक पश्चिम मतदारसंघातून 16 उमेदवारांनी 31 अर्ज घेतले असून भाजप उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्यासह महेश हिरे तसेच मनसेचे दिलीप दातार, जरांगे पाटील गटाचे करण गायकर हे देखील अर्ज येणार आहेत. देवळालीत 33 अर्ज विकले गेले असून दिवसभरात 12 उमेदवारांनी 33 अर्ज खरेदी केले. तर अर्ज नेणाऱ्यांमध्ये अविनाश शिंदे, डॉ. राजश्री अहिरराव, प्रतिम आढाव, लक्ष्मी ताठे, लक्ष्मण मंडाले यांचा प्रमुख समावेश आहे. तसेच इगतपुरी-त्रंबकेश्वर मतदारसंघात उमेदवारांनी 13 अर्ज नेले असून विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्याबरोबर वामन खोसकर, कावजी ठाकरे, भाऊराव ढगळे, डॉ. तळपडे यांनी अर्ज नेले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here