Narhari Zirwal | राज्यामध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. अशातच महाविकास आघाडीसह महायुतीत काही ठिकाणी घटक पक्षातील तीनही पक्षांमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढले असून दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्याचवेळी शिंदे गटाकडून असलेल्या धनराज महाले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, दिंडोरीत नरहरी झिरवळांसह महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे दिंडोरीमध्ये युतीधर्म पाळला जाणार की नाही? याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.
Narhari Zirwal | ‘शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासोबत’; झिरवाळांच्या विधानाने खळबळ
नरहरी झिरवाळांच्या अडचणींत वाढ
तर महायुतीच्या वाटाघाटीत दिंडोरीची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला देण्यात आली असून या ठिकाणी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळांना उमेदवारी घोषित करण्यात आल्याने आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु याचवेळी महायुतीमधील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या शिंदेसेनेकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी आमदार धनराज महाले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षाकडून अथवा अपक्ष लढणार अशी भूमिका महालेंनी घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
Narhari Zhirwal | महायुतीत बंडाचे सुर; झिरवाळांपुढे नवे आव्हान!
कोण आहेत धनराज महाले?
धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार असून, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेना शिंदे गटाकडून दिंडोरीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम