Assembly Election | सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाबाबत मोठे विधान केले आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी 80 किंवा 90 आकड्याचा हट्ट धरला नसून आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फॉर्मुला’ निश्चित केला आहे. तिथे शिंदे गट जिंकतील तिथे त्यांचा आग्रह असेल, जिथे अजित पवार आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह असेल आणि जिथे भाजपचे उमेदवार जिंकतील तिथे आमचा आग्रह असेल. असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर आत्तापर्यंत 70 टक्के जागांवर एकमत झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंवर केली टीका
“आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष सत्ता सांभाळली पण ते कधी मंत्रालयात गेले नाहीत, विधानभवनात गेले नाहीत आणि आता जुनी पेन्शन देऊ असे खोटे बोलत आहेत.” असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्याचबरोबर “सोयाबीन बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच पीक आल्यावरती मोठा फायदा दिसून येईल संजय गायकवाड यांचा समर्थन करत नाही. पण आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले.
Assembly Election | विधानसभा निवडणुका ‘या’ महिन्यात होणार?; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी काँग्रेसच्या तीन पिढ्यांच्या जे पोटात होते ते आता ओठावर येऊ लागले आहे. एनडीए सरकार संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला होता, तेव्हा आता काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलाय काँग्रेसचं आरक्षणाचे खरे मारेकरी आहे. जरांगे पाटलांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे.” असे देखील ते यावेळेस म्हणाले. त्याचबरोबर, “देवेंद्र फडणवीस फक्त गणपती दर्शनासाठी अमित पटेल यांच्या घरी गेले होते, यामध्ये राजकीय काही नाही.” असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम