आसाममध्ये पुराचा कहर, अतिवृष्टीमुळे १० हजारांहून अधिक लोक बेघर

0
15
Assam flood situation turns critical
आसाममध्ये पुराचा कहर, अतिवृष्टीमुळे १० हजारांहून अधिक लोक बेघर

आगरतळा : आसाम त्रिपुरामध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुराला राज्यातील १० हजारांहून अधिक लोक तोंड देत आहे. अशी माहिती सुत्रांना दिली आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील सदर उपविभागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Assam flood) दोन हजारांहून अधिक लोक बेघर झालेत.

पुराचा परिणाम पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील आगरतळा आणि त्याच्या शेजारील भागात मर्यादित आहे, जिथे हावडा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि आगरतळा महापालिका आणि त्याच्या लगतचे भाग (Assam flood) पाण्याखाली गेले आहेत.मात्र, पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी सरत कुमार दास यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५५ मिमी पाऊस पडला असून, हावडा नदीकाठी अनेक सखल भागात पाणी शिरले आहे.

हे सुद्धा वाचा : 

देवळालीत जुलैपासून प्लास्टिकविरोधात कारवाई

जवळपास आठ तास पाऊस न झाल्याने हावडा नदीची पाणीपातळी धोक्याच्या इशाऱ्याहून खाली आली आहे. येत्या २४ तासांत हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला (Assam flood) असल्याने रविवारी परिस्थिती आणखी सुधारेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार १५ रुपयांनी स्वस्त


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here