Maratha reservation | जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्री पलटले..

0
24
Manoj Jarange
Manoj Jarange

Maratha reservation |  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी          २ नोव्हेंबर रोजी त्यांचं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. आणि जरांगे यांना राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली व आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार पुढील दोन महिन्यांत काय काय करणार याचीही माहिती दिली. दरम्यान, सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यानुसार जरांगे यांनी राज्य सरकाला दोन महिन्यांचा वेळ देण्याचं जाहीर केलं आहे.

Gold Silver Rate | दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी पुन्हा झळाळले…

सरसकट आरक्षणाची मागणीच नाही – एकनाथ शिंदे 

उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे यांना मराठा समाजाला  सरसकट देण्याबाबत आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता. त्यावर शिंदे म्हणाले, ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना युद्धपातळीवर प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. सरसकट आरक्षणाची त्यांची मागणीच नाही, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच दाखले देण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि यामध्ये सरकार वेळकाढूपणा करणार नाही.

सरसकट आरक्षणाबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,  तुम्ही पत्रकार असं कुठेही भरकटवू नका. जरांगेंनी सांगितलंय की, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना तुम्ही तातडीने दाखले द्या. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०-१० लोक जास्तीचे द्या. पुढच्या दोन महिन्यांत हे काम करा. असं आश्वासन आमच्या लोकांनी जरांगे यांना दिलं आहे.

India cricket team: भारतीय संघ हा इतिहास रचणार…! जो क्रिकेटच्या ५० वर्षांच्या इतिहासात घडला नाही

काय म्हणाले जरांगे पाटील..? 

दुसरीकडे, उपोषण सोडताना जरांगे पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले, आपण या दोन महिन्यांत आपलं आंदोलन सुरूच ठेवू. राज्य सरकारला दोन महिने हवे आहे. सरकारला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काम करायचं आहे. त्यांनी तीन आयोग स्थापन केले आहे. राज्य मागासवर्ग आयोगालाही यासाठी काम करायचं आहे. निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीलाही काम करायचं आहे. अजून एक समिती मार्गदर्शन करणार आहे. हे सगळं मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळावं म्हणून करायचं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here