Nashik News | आणखी एक अधिकारी लढवणार देवळालीतून निवडणूक

0
47

Nashik News | अलीकडच्या काळात प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर अनेक अधिकारी राजकारणातही सक्रिय दिसतात. अनेक अधिकारी निवडणुका लढवून मोठ्या पदावरही पोहाेचलेत. दरम्यान, आता मुंबईचे माजी पोलिस उपायुक्त डॉ. संजय अपरांती हेदेखील निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याने मतदारसंघाला अनेक वर्षांनंतर सुशिक्षित उमेदवार मिळणार असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करायचा ठरवले आहे. तर निवडणुकीच्या आधी ते आराम करण्याऐवजी गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहेत.

धक्कादायक! मुलीनं प्रियकराशी लग्न करु नये म्हणून कुटुंबीयांचा अघोरी प्रकार

देवळाली मतदार संघ 

त्यामुळे आता डॉ. संजय अपरांती हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघाची सध्याची अवस्था बघता आतापर्यंत माजी मंत्री बबन घोलप, त्यानंतर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असलेल्या सरोज अहिरे यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

कोण आहेत हे नवे उमेदवार..?

डॉ. संजय अपरांती यांनी २३ वर्षे पोलिस विभागात क्लास वन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. ते अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत. त्यानंतर चार वर्षे राज्यपाल महोदयांचे  एडीसी म्हणून त्यांनी काम बघितले आहे. नाशिक शहरातही सहायक पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे.

तसेच नाशिक ग्रामीणमध्येही उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी अडीच वर्षे काम बघितले आहे. नाशिकमधील या साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. मुंबईमध्ये पोलिस उपायुक्त असताना त्यांनी डान्स बारबंदी हा महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला.

निवृत्तीनंतर त्यांनी २०१४ पासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते मार्गदर्शन करित आहेत. त्यासाठी त्यांनी अपरांती अॅकॅडमीही सुरू केली आहे. या अॅकॅडमीत ते रोज संध्याकाळी दोन तास विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. सुमारे २०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाली आहेत.

Suhas Kande | आ. कांदे विरोधी पक्षांच्या टार्गेटवर…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here