निवडणुकीच्या मैदानात शिंदे-ठाकरे गट प्रथमच आमनेसामने, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

0
16

मुंबई – राज्यात घडलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या मैदानात प्रथमच आमनेसामने भिडणार आहे. यासाठीचे पहिले पाऊल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टाकले आहे.

अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते, त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अंधेरी-पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, कारण एकनाथ शिंदे हे बंडानंतर प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. तसेच या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या सुप्रीम कोर्टात हे दोन्ही प्रकरणे प्रलंबित आहे. जर अंधेरी-पूर्वची पोटनिवडणूक होईपर्यंत या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागला नाही, तर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत शिंदे आणि ठाकरे यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here