अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार ? पटोले स्पष्टच बोलले

0
24
nana patole congress
नाना पटोलेंचा केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप

महाविकास आघाडी त बिघडी होते की काय अशी शक्यता होती मात्र आघाडीत तूर्तास तर वाद टळला आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत वादाची ठिणगी पडनार असा अंदाज होता मात्र तसे काही न होता आघाडीत एकी दिसून आली आहे. (Andheri East Bypoll Election) याठिकाणी शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाने ही जागा भाजपाला दिली आहे. तर काँग्रेसने या पोटनिवडणुकीत शिवसेनेला (Congress Support Shivsena) पाठिंबा देत आघाडी धर्म जपला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्याकडे होता मात्र त्यांच्या आकस्मित निधनाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून तुल्यबळ लढतीची शक्यता वाढली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसल्याने सेनेचा उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) याआधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असल्याने ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-शिंदे गट अशी होणार आहे. याठिकाणी दोन्ही गटांची ताकद लागणार आहे.

पटोले बोलतांना म्हटले की, या विधानसभा पोट निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली. राज्यात अडीच वर्षे आघाडीचे सरकार होतं. आम्ही शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक जनहिताचे निर्णय घेतले. कोरोनासारख्या संकट काळात देशात सर्वोत्तम काम केले आमच्या कामाची दखल जगणे घेतली. पण सत्तापिपासू लोभी भाजपाने ED,CBI सारख्या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडत आघाडी सरकार पाडले असल्याचा पटोले यांनी घणाघात केला. आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाही म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला असा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाविरोधात या लढाईत आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसल्याने शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकद लावत काम करतील असे पटोले म्हणाले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत 3 नोव्हेंबर रोजी मतदान तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार असून संपुर्ण राज्याचे लक्ष याठिकाणी असेल भाजपकडून माजी नगरसेवक मुराजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. शिवसैनिकांच्या मनोधैर्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल.

काँग्रेसला कोल्हापुरात पाठिंबा सेनेचा
गेल्या वेळी झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा देत पक्षातील बंडखोरी थोपवली होती.

या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय देखील झाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी प्राप्त केला. जाधव यांना 96226 मते तर, भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना 77426 मते मिळाली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here