Dhule : धुळ्यातील ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न…

0
13

Dhule : गेल्या काही पासून धुळ्यातील पाणीप्रश्नाने राजकीय वातावरण चांगलंच पेटल आहे. प्रत्येक दिवसाआड येथे पाण्यासाठी आंदोलने केली जाताय. आज सुद्धा असाच एक हंडा मोर्चा सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्वसामान्य धुळेकरांकडून काढण्यात आला होता. यासाठी सर्वसामान्यांना या आंदोलनात सहभागी होता यावे म्हणून महापालिकेसमोर बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र काही जणांकडून हे बॅनर्स या अचनकपणे हटवण्यात आले. तसेच पोलिसांना हाताशी घेत सत्ताधाऱ्याकडून बॅनर्स छापणाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांनी केलाय. तसेच महापालिकेच्या गेट समोर एक दिवसाआड पाणी द्या अन्यथा राजीनामे द्या अशी मागणी रस्त्यावर लिहून करण्यात आली होती. मात्र सकाळच्या सुमारास हे आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने भाजप पदाधिकाऱ्यांकच्या वतीने रस्ता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

दरम्यान यावेळी रस्त्यावर लिहिण्यात आलेला मजकूर खोडून काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होता. मात्र यावेळी आक्रमक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आणि काही तासांच्या संघर्षानंतर या ठिकाणी रस्त्यावर लिहिण्यात आलेला तो मजकूर पूर्ववत करण्यात आला. दरम्यान जोपर्यंत धुळे शहरातील पाणी प्रश्न सुटत नाही, महापालिकेत सत्तेत असलेला भाजपाने दिलेली आश्वासन भाजप पूर्ण करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका आता विरोधक व सामान्य जनतेने घेतल्यामुळे भाजपची गळचेपी होत आहे. यामुळे भविष्यात धुळे शहरातील राजकारण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. तर भविष्यात पाणी प्रश्न आणि इतर मागण्यांसाठी ही आंदोलनाची मालिका अशीच सुरू राहणार की महापालिका प्रशासन याकडे गंभीरतापूर्वक बघत याला पूर्णविराम देणार का? याकडे आता धुळेकर जनतेचे लक्ष लागले आहे.

 

सकाळच्या सुमारास हे आंदोलन दडपण्याच्या उद्देशाने भाजप पदाधिकाऱ्यांकच्या वतीने रस्ता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही आंदोलन अशीच सुरू राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

आनंद लोंढे – सामाजिक कार्यकर्ते – धुळे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here