Ameesha Patel बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘गदर 2’ची अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. खरं तर, रांची येथील एका दिवाणी न्यायालयाने अमीषा आणि तिचा व्यवसाय भागीदार क्रुणाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात गुरुवारी वॉरंट जारी केले आहे. तक्रार दाखल करणारा अजय कुमार सिंग हा झारखंडचा चित्रपट निर्माता आहे. त्यानेच अमिषा पटेल आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता.(Ameesha Patel)
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रांचीच्या दिवाणी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी समन्स बजावूनही अमिषा पटले किंवा त्यांचे वकील न्यायालयात हजर न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 15 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे.(Ameesha Patel)
काय आहे प्रकरण (Ameesha Patel)
रांची जिल्ह्यातील हरमू येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी अभिनेत्री अमिषा आणि तिच्या व्यावसायिक भागीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, अमिषाने त्याला देसी मॅजिक नावाच्या चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्याने चित्रपटाच्या मेकिंग आणि प्रमोशनसाठी अमीषाच्या बँक खात्यात २.५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. फिर्यादीनुसार, 2013 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, मात्र अद्याप चित्रपट पूर्ण झालेला नाही. म्हणूनच अजयने त्याचे पैसे परत मागितले आहेत कारण अमीषा आणि तिच्या व्यावसायिक भागीदाराने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले होते.
अमिषाचा चेक बाऊन्स (Ameesha Patel)
तक्रारकर्त्याने पुढे म्हटले आहे की, वारंवार उशीर केल्यावर अमिषाने ऑक्टोबर 2018 मध्ये त्याला 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले, जे बाऊन्स झाले. त्याच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 420 आणि 120 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ameesha Patel)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम