sanjay raut| अजित पवारांना कोणता मच्छर असा अचानक चावला याचा तपास झाला पाहिजे- खा. राऊत

0
27

sanjay raut|   हे मराठा आरक्षणावर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातून पलायन केलं आहे. दरम्यान, एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना, इतका खदखदत असताना छत्तीसगडमध्ये जाऊन प्रचार करताहेत. छत्तीसगडचा प्रचार महत्त्वाचा की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था? आणि आमच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना तर राजकीय डेंग्यू झालाय.

ते तर ह्या प्रक्रियेतून बाहेर आहेत. आता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि त्यांना डेंग्यू झाला हा तर तपासाचा भाग आहे. की इतक्या मोक्याच्या क्षणी त्यांना कोणता मच्छर चावला आणि लगेच डेंग्यू झाला, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:ला खूप जबाबदार व कर्तबगार समजतात. राज्याची त्यांना खडा न् खडा माहिती असते. मग,राज्य इतकं पेटलेलं असताना ते स्वतःच राज्यात का नाही. त्यांच्याकडे तर गृहमंत्रीपदाची जबाबदारी आहे. राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी असलेला नेता राज्य सोडून असं कसं जाऊ शकतो?, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी  केला.

मराठा आरक्षण | केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा! ठाकरेंचा हल्लाबोल

राजीनामा द्या… 

लोकप्रतिनिधींची घरंही पेटवली जाताहेत. नेत्यांना गावबंदी केली जात आहे. गावात येऊ दिलं जात नाहीये. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे  चिघळत चाललं आहे. मला दिल्लीत समजलं की, ते आज पडले. आणि राज्याचे गृहमंत्री छत्तीसगडमध्ये भाषणं करत फिरताहेत. ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. गृहमंत्री ज्या पद्धतीने बेदरकारपणे वागताहेत, यापद्धतीने त्यांना ह्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांचा अवाकाच नाही

नेत्यांना गावात येऊ दिलं जात नाहीये. आमदारांची घरे जाळली जात आहे. लोक रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. कुठे आहे यांचं कायद्याचं राज्य? ते केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठीच आहे का? खोटे खटले दाखल करणं हे कायद्याचं राज्यआहे का? सरकार अस्तित्वातच नाही. यांना निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. बेकायदेशीर सरकार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाकाच नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे, असे खडेबोलही त्यांनी लगावले.

नार्वेकर अपात्र

मूळात राहुल नार्वेकर यांनाच सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवायला पाहिजे. ते या पदासाठी अपात्रच आहेत. ज्याप्रकारे. ते चालढकल करताहेत,  ते सर्वोच्च न्यायालयाला फाट्यावर मारत आहे, ते संविधानाला मानत नाही, अशी व्यक्ती कुठल्याही घटनात्मक पदावर असेल तर ते अपात्र आहे. आधी त्यांना अपात्र करायला पाहिजे. आणि मग इतर आमदारांना अपात्र करायला पाहिजे, असंही  ते म्हणाले.

Nashik News| नाशिकहून जायकवडीला पाणी सोडणार; पाणी संघर्ष पेटणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here