Ajit Pawar | सध्या महाराष्ट्रातील वातावरण अनेक कारणांनी तापल्याच पाहायला मिळत आहे. कांदा निर्यातबंदी असो किंवा मराठा आरक्षण असो सध्या महाराष्ट्रात आंदोलनकर्ते थेट रस्त्यावर उतरत आंदोलन करता आहेत, यातच महाराष्ट्रातील तरुण वर्ग देखील मोठ्या परांनात संतप्त झाल्याचं चित्र आहे. आता ‘पीएचडी करणे म्हणजे पक्ष बदलण्यासारखं नाही, दहावी नापास अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये’ अशा शब्दात विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सुनावलेलं आहे. काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जाते आहे.
Beed Crime | शाळेत शिक्षिकांचे अश्लील कृत्य, घटनेमुळे विद्यार्थी हादरले
नेमकं प्रकरण काय? Ajit Pawar on PHD
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात बोलताना धक्कादायक वक्तव्य केलं होतं आणि आता त्यामुळं राज्य सरकारचा संशोधकांच्या फेलोशिपला विरोध करत असल्याचं सांगत राज्यभर विद्यार्थ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर पुण्यातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अशोभनीय असून दहावी नापास असलेल्या अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये की आम्ही किती शिक्षण घ्यायचं, असे विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे. (Ajit Pawar)
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे एक नवा वाद उफाळून आला आहे. सारथी योजनेच्या माध्यमातून पीएचडीसाठी 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप सरकारकडून दिली जाणार असून याबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केलेला होता.
त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत? असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते आणि त्यावर आता पीएचडी पदवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे.
Breaking News | लोकसभेत घातला राडा; संसदेत शिरणाऱ्या दोघांपैकी एक मराठी
‘उपमु्ख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा कोणतेही वक्तव्य करणं चुकीचे असून दहावी पास नेत्याने आमच्या पीएचडीची लायकी काढू नये. आम्ही पीएचडी करुन काय करतो हे सगळ्या देशाला माहिती असताना ज्या तंत्रज्ञानाचे फायदे तुम्ही घेताय ते पीएचडी केलेल्या संशोधनातून आलेले आहेत. पीएचडी करुन देशाचे संविधान लिहीले जाते आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा पीएचडी धारक होते. तुम्ही तर दहावी नापास आहात आधी दहावी पास व्हा’ असा सल्ला एका विद्यार्थ्यांने उपमुख्यमंत्री अजित पवार दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम