Ajit Pawar MLA | राज्यात अजित पवार गट महायुतीत गेल्यानंतर अनेक आमदार आणि बडे नेतेमंडळी हे त्यांच्यासोबत गेले. तर, यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी संपल्याच्या सुरू होत्या. मात्र, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतच त्यांना ‘राजकारणातील चाणक्य’ का म्हणतात हे दाखवून दिले. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला या फोडाफोडीच्या राजकारणाचा चांगलाच फटका बसला असून, महाविकास आघाडीला मात्र मतदारांनी पसंती दिली. यात २८ जागा लढवून भाजपला ९ जागा, शिंदे गटाला ७ तर, अजित पवार गटाला १ जागा मिळाली.(Ajit Pawar MLA)
स्वतःच्या पत्नीलाही अजित पवार निवडून आले शकले नाही आणि आज एनडीएच्या बैठकीलाही ते गैरहजर राहिल्याने अजित पवार महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही दावा केला होता की, सुनील तटकरे व धनंजय मुंडे हे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर, ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका किंवा चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यांच्यासाठी पक्षात परतीचे दरवाजे उघडे असणार असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. (Ajit Pawar MLA)
Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता
Ajit Pawar MLA | अजितदादा गटात भूकंप..?
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे निमित्त साधत अजित पवारांच्या तब्बल दहा आमदारांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. तसेच अजित पवारांचे हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे एकूणच महायुतीत होत असलेली अजित पवार गटाची गळचेपी पाहता विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा गटात भूकंप होण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar MLA)
१० आमदार सुप्रिया सुळेंच्या संपर्कात
दरम्यान, महायुतीत नाराज असलेल्या आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनपर संदेश पाठवत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिले, जगावाटपातही त्यांच्यावर दबाव टाकत कमी जागा देण्यात आल्या. उमेदवारांचा पराभव, अशी एकूणच अजित पवारांची भूमिका पाहता त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल असून, हे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर, किमान १० आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnavis | पराभवाने फडणवीस खचले, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम