Ajit Pawar : राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा अधूनमधून सुरु असतेच. विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याचे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार स्पष्ट केले जात आहे. या पुर्ण प्रकरणात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले जात आहेत. आता पुन्हा ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले आहे. पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर हे बॅनर पुण्यात झळकत आहेत.(Ajit Pawar )
Deola | शेतकरी वर्गात अस्वस्थता; खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची खंत व्यक्त
नक्की कुठे झळकले बॅनर?
“टायगर इज बॅक…या आशयाचे बॅनर आता पुण्यात झळकलेले आहेत. विद्यामान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासंदर्भात हे बॅनर झळकत आहेत. ‘आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री’ अशा आशयाचे पोस्टर पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून लावण्यात आलेले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी हे बॅनर लावलेले आहे. त्यानंतर राज्यात या बॅनरची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
चंद्रकांत पाटील यांना डच्चू देत अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज होते का?अशी चर्चा देखील रंगली होती पण चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोन दादांच्या भांडणात अजित पवार वरचढ ठरलेले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, पण आत्ता नाही. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये २०२४ नंतर अजित पवार मुख्यमंत्री असतील, असे चर्चा केली जात आहे.
Maharashtra News : अजितदादा मुख्यमंत्री होणार?धर्मरावबाबा यांच वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी पुण्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण पुण्यातुन चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदाचे महत्त्वकांक्षा असताना त्यांना थेट अमरावती आणि सोलापूरला पाठवण्यात आले आहे . त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा देखील आहे. याचवेळी अशा प्रकारची बॅनरबाजी कितपत योग्य आहे? असा सवाल भाजप कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम