Ajit pawar : कालपर्यंत ज्यांच्यावर केले आरोप आज त्यांचे गायले जाताय गोडवे..

0
42

Ajit Pawar : नुकताच गडचिरोली मध्ये असलेल्या गोंडवाना विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा व शासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये सरकारी कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मिळाल याचा आनंद आहे असं म्हटलंय.

तर गेल्या नऊ वर्षांपासून आपला देश आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात विकासाच्या दिशेने आगे कूच करतोय. मोदी साहेबांच्या नेतृत्वात राज्यातही अनेक विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे देश विकासाकडे जातोय. महाराष्ट्र सरकार गडचिरोली मध्ये एक मोठं विमानतळ उभा करण्याचा निर्णय घेत आहे. तसेच गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गडचिरोलीतील आपले पोलीस बांधव उत्तमरीत्या काम करत असल्याच सांगत त्यांनी पोलिसांच कौतुक केलं तर पोलिसांच्या उपचारासाठी विशेष रुग्णालय बांधण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचा देखील सांगितलं आहे. याचबरोबर गडचिरोलीत इतर विकास कामांसोबत रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. मागच्या काही काळापासून केंद्र सरकार गडचिरोली सारख्या दुर्गम भागात लक्ष घालते आहे. लोकांच्या मनातून नक्षलवाद दूर व्हावा आणि रोजगार वाढावा यासाठी सरकार काम करत आहे. राष्ट्रवादीने विकासासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितलं तर कोणी काही म्हणत असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपल्याला आता विकासाची काम करत पुढे जायचं आहे. असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाकडे बोट दाखवल आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी धर्मराज बाबा आत्राम यांच्या रूपाने एक मंत्रीपद गडचिरोलीच्या विकासासाठी दिल आहे. ते आपल्या भागाचा विकास करतील आणि आपला गडचिरोली जिल्हा 36 जिल्ह्यात एक नंबरला आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून सर्व एकत्रपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी काम करू असं म्हणत त्यांनी मी आपल्याला खात्री देतो किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कुठेही काही कमी पडू देणार नाही असं आश्वासन उपस्थितांना दिल आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here