जळगाव : राज्यात झालेल्या राजकिय भुकंपाने ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादीची बैठक बोलवली असून एकनाथ खडसे हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
विधान परिषदेच्या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मंगळवारी मुक्ताईनगर येथे आले होते. जळगाव व मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात खडसेंचा स्वागत केले.
राज्यात झालेल्या राजकिय भुकंपाने ठाकरे सरकार संकटात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार टीकते की नाही? हे आद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे खडसेंनी जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
मुंबईत बैठकीसाठी रवाना
राज्यातील शिवसेनेतील घडामोडींवर आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना उपस्थीत राहण्याचे आदेश काढले. यामुळे जळगावातील सत्काराचे कार्यक्रम रद्द करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम