पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. आज पुणे विद्यापीठात अजित पवार आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते खाशाबा जाधव क्रीडा संकुलचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी अजितदादांनी रायफल शूटिंगचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, अजितदादांनी अचून निशाणा साधला.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली. यानंतर अजित पवारांनी विविध विभागात जाऊन पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी रायफल शूटिंगचा आनंद घेतला. पहिले उदय सामंत यांनी अचूक निशाणा साधला. त्यानंतर अजितदादांनीही बरोबर निशाणा साधून उदय सामंत यांची बरोबर केली.
हातावरील टॅटू मैत्रिणीचा का?
त्यानंतर, अजित पवार आणि उदय सामंत यांनी जिमची पाहणी केली होती. यावेळी, माहिती देणाऱ्याच्या तरुणाच्या हातावरील टॅटूकडे अजितदादांचं लक्ष गेलं आणि थेट तरुणा विचारलं, कुण्याच्या नावाचा टॅटू आहे मैत्रिणीचा का? असं विचारताच बघ्याच्या गर्दीत एकच हश्शा पिकला.
पर्यावरण संवर्धनसाठी काम करा
यावेळी अजित पवार म्हणाले, पर्यावरण रक्षण संवर्धनसाठी एकत्र काम करा. ग्लोबल वर्मिंगसाठी आपणच कारणीभूत आहोत. 356 दिवस पर्यावरण दिन साजरा केला पाहिजे. तरच पुढच्या पिढीला पर्यावरण बघता येईल, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं. तसेच मी लावलेल्या झाडाची पाहणी अधून मधून करणार आहे. खत पाणी घालून उदय सामंत यांनी लावलेल्या झाडा पेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार आहे, असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हश्शा पिकला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम