Ajit Pawar | लवकरच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक आणि महापालिका निवडणुकांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील सर्वच पक्षाकडून ह्या आगामी निवडणुकांची जोरदार तयारी ही आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, आपापल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे खूश आणि समाधानी असायला हवे. यासाठी आता पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे आणि मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहे. (Ajit Pawar)
तसेच सर्वच पक्षाकडून आपापल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातून एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. यानुसार आता अजित पवार गटाच्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांना प्रचार करण्यासाठी नव्या कोऱ्या चारचाकी गाडी देण्यात येणार आहे.
Shirdi | शिर्डीत ‘नो मास्क, नो एंट्री’; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
आज टेस्ट ड्राइव |(Ajit Pawar)
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाला आपापल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी आता आजित दादा गटाकडून प्रत्येकी चारचाकी वाहन देण्यात येणार असल्याची घोषणा स्वतः अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेली होती.
दरम्यान, यासाठी आता ४० पेक्षा जास्त चारचाकी गाड्या ह्या अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून विकत घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, ह्या गाड्या आज ‘टेस्ट ड्राईव्ह’ साठी पक्षाच्या मुख्य कार्यालयात दाखल झालेल्या आहेत. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलीच टीका केली आहे.
NAMCO Bank | नामकोत ‘प्रगती’ची जीप सुसाट; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त
ते ४० काय ४०० देतील…
“प्रत्येकाला ह्या गाडीला बांधून ठेवायचं आहे, म्हणजे पळून जायला नको. पळणाऱ्यांची त्यांना खूप भीती आहे, कधी काय कसं होईल काहीच सांगता येत नाही. फक्त निवडणुका जाहीर होऊ द्या. मग बघा यांची पळापळ. ते ४० काय ४०० गाड्या देतील. आणि यासोबतच ते आता कालांतराने प्रत्येक आमदारालाही गाडी देणार आहेत. आणि त्या गाडीबरोबर दोन माणसंही देणार आहेत. सोबतच त्यांना ड्रायव्हरही देतील. कारण त्यांच्यावर नजर ठेवायला लागेल ना, निवडणूक जाहीर झाल्यावर कुणीही पळून जायला नको”, असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अजित दादांना लगावला आहे.(Ajit Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम