Ajit Pawar| राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीला जाणार होते. पण, संतप्त मराठा समाजाच्यावतीने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या दौऱ्यासाठीही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळेच कदाचित त्यांनी दौरा रद्द केला असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या ह्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला आहे. माळेगाव कारखान्यापर्यंत अजित पवार यांना जाऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. पुढाऱ्यांसह कुठल्याही नेत्यांना बारामती तालुक्यात फिरकूही देणार नाही, अशी ठोस भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. अजित पवार यांनी बारामतीत येऊ नये, अशा आशयाचे पत्र बारामतीमधील कार्यकर्त्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिले होते. त्यानंतर पोलीस व मराठा कार्यकर्त्यां मध्ये चर्चाही झाली. पण, ती निष्फळ ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला येऊच देणार नाही या भूमिकेवर मराठा कार्यकर्ते शेवटपर्यंत ठाम होते.
६ नोव्हेंबरला होणार देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक
पोलिसांचा तगडा बंदोबस्त…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी तणावग्रस्त परिस्थिति निर्माण होऊ नये व काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल ५०० पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करु नये,असे आवाहनदेखील पोलिसांकडून केलं जात आहे.
पुण्यात दाखल
आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. पण, त्यांना गावबंदीचा फटका चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. मराठ्यांचा आक्रोश पाहून अजित पवार यांनी बारामती दौरा रद्द केला असावा अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे बारामतीला जाण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात दाखल झाले आहेत.
कार्यकर्ते आक्रमक
राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना तसेच नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका अनेक राजकीय पुढारी व नेत्यांना बसत आहे. काल पुण्यात विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या ताफ्यालाही काळे झेंडे दाखवण्यात आले होते. अशीच परिस्थिती राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत आहे.
Onion News | ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपयांनी कांदा विकणार; भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राने घेतला निर्णय
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम