द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : Airtel कंपनीने प्रीपेड किमतीत वाढ केल्याने युजर्सना चांगलाच झटका बसला आहे. कारण याआधीही airtel कंपनीने जुलै महिन्यात पोस्ट पेड किमतीत वाढ केली होती.
मोबाईल सेवा प्रदाता कंपनी भारती ( airtel ) ने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केल्याची घोषणा केली आहे. एअरटेलने जारी केलेल्या नवीन टँरीफ दर हे 26 नोव्हेंबर पासून लागून करण्यात येणार आहेत.
Airtel ने प्रीपेड प्लॅनवर टँरीफ 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. Airtel च्या प्रीपेड प्लॅन मध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे.
मात्र आता airtrl च्या 28 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 99 रुपयांपासून सुरू होईल. म्हणजेच या प्लॅन मध्ये 25 टक्के वाढ झाली आहे.
कंपनीने जुलैमध्ये 49 रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता दरम्यान हा प्लॅन एसएमएस शिवाय येत नाही . जर तुम्हाला एसएमएस (sms ) देखील हवे असतील तर तुम्हाला 149 रुपयांसाठी 179रुपये खर्च करावे लागतील.
या प्लॅन मध्ये 20 टक्के वाढ करण्यात आली आहे या बेनिफिट आणि 1GB डेटासह 219 रुपयांचा प्लॅन देखील येत होता आता त्याची किंमत 265 रुपयांवर गेली आहे.
या प्रीपेड प्लॅनची नवीन किंमत 26 नोव्हेंबरपासुन सुरु होईल. दरम्यान रिलायन्स जिओ ( Reliance jio) आणि व्होडाफोनने आद्यप दरवाढीची घोषणा केलेली नाही. मात्र या कंपन्या लवकरच त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवू शकतात असेही म्हंटले जाते.
इतकंच नाही तर अनेक हॅकर्स आपल्या चतुराईने युजर्सना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत हा धोका लक्षात घेता. आपल्या उजर्सला अलर्ट करण्यासाठी कंपनीने email द्वारे सूचित केले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] *Airtel नं आपल्या ग्राहकांना दिला अजून दणक… […]