देवीचं दर्शन करून निघालेल्यांवर काळाचा घाला…

0
19

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; एक दुःखद अशी अपघाताची घटना घडली आहे. ज्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले.

माता एकविरा देवी च्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला.

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला. यात तिघा जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

पालघर जिल्ह्यातील मनोर जवळ हा भीषण अपघात झाला असल्याचं सांगण्यात येतंय. इको कार आणि कंटेनर च्या धडकेत इको कारचा पुढचा भाग पूर्णतः चक्का चूर झाला.

या अपघातामध्ये चालकासह तिघांना आपले प्राण गमवावे लागले. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

मृतांमध्ये हेमंत तरे, राकेश तामोरे आणि सुषमा आरेकर यांचा समावेश आहे.

माता एकविरा देवीच्या दर्शनाला हे सारे भाविक गेलेले होते. मात्र देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन परतत असताना, काळाने त्यांच्यावर घाला घातला.

पालघर जिल्ह्याच्या मनोर जवळ आवंढानी गावाच्या हद्दीत हा भयावह अपघात घडला. इको कार ने कंटेनर ला धडक दिल्याने, हा अपघात घडला.

यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. ते नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत हेमंत तारे यांचे वय 60 वर्ष, राकेश तामोरे यांचे वय 42 वर्ष आणि सुषमा आरेकर यांचे वय 32 वर्ष होते.

हे सर्व भाविक हे पालघर जिल्ह्याच्या दांडी येथील रहिवासी होते.

जखमी झालेल्या नऊ जणांमध्ये तीन चिमुकल्यांचा देखील समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. आणि जखमींना उपचारा साठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

देवीच्या दर्शनाला गेलेल्या या भाविकांवर असा काळाने घाला घातल्याने, हळहळ व्यक्त केली जातेय.

ही बातमी वाचलीत का?

मोबाईल सेवा प्रदाता कंपनी भारती ( airtel ) ने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केल्याची घोषणा केली आहे.

एअरटेलने जारी केलेल्या नवीन टँरीफ दर हे 26 नोव्हेंबर पासून लागून करण्यात येणार आहेत.

Airtel ने प्रीपेड प्लॅनवर टँरीफ 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. Airtel च्या प्रीपेड प्लॅन मध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे.

मात्र आता airtel च्या 28 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 99 रुपयांपासून सुरू होईल. म्हणजेच या प्लॅन मध्ये 25 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीने जुलैमध्ये 49 रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता दरम्यान हा प्लॅन एसएमएस शिवाय येत नाही .

जर तुम्हाला एसएमएस (sms ) देखील हवे असतील तर तुम्हाला 149 रुपयांसाठी 179रुपये खर्च करावे लागतील.

पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

*Airtel नं आपल्या ग्राहकांना दिला अजून दणका ; आता अजून एवढे वाढले दर*


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here