Maratha Reservation | जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची झोप उडाली

0
14

Maratha Reservation | पहिल्या वेळी ४० दिवसांचा अवधी दिल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. सोबतच ही शेवटची संधी देत असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सरकारपासून तर थेट जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वचजण आता कंबर कसून कामाला लागले आहेत.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विषेश कक्ष हे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही असेच जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत ७५ पेक्षा अधिक जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी दिली आहे.

Malegaon | मी तुरुंगातून निवडणूक लढवेल, पण भुसेंचा पराभव करणारच

हे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक आणि अनिवार्य  पुराव्याची तपासणी करण्यासाठी सरकारतर्फे निवृत्त न्या.शिंदे समितीची स्थापना केली आहे. या समितीने पुराव्याची वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळातील करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करणे व पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियाही सुरु आहे.

यासाठी समितीच्या निर्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत ७५ पेक्षा जास्त कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.

मोठी बातमी | लासलगाव बाजार समितीत आजपासून १२ दिवस कांद्याचे लिलाव राहणार बंद

असे आहे कक्षाचे कार्य

या जिल्हास्तरीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्ष येथे उपस्थित राहुन विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेख उपलब्ध करुन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेख वेगळे करुन त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास आणि समिती समोर सादर करणे इत्यादी कामे कालमर्यादेत  करण्यात येत आहेत.

याशिवाय न्यायालयातील जुन्या अभिलेखांमध्येही कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन १९६७ पुर्वीचे) अभिलेख उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित न्यायालयांकडे विनंती करुन अभिलेख उपलब्ध करुन घेतले जात आहेत. आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात एकूण ७५ पेक्षा अधिक कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.

Winter Update | दिवाळीत नाशिककर गारठणार! तापमानात होणार 2 अंशांनी घट


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here