Malegaon | शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था कर्ज प्रकरणी फसवणूकीच्या आरोपावरुन ते मागील आठ दिवसांपासून पोलिस कोठडीत होते.
न्यायालयाने यापुर्वी त्यांना सुरुवातीला पाच दिवस व त्यानंतर २३ नोव्हेंबरपर्यंत (तीन दिवस) पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी (दि. २३) पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्या. एस. बी. बहाळकर यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हिरे यांच्यातर्फे युक्तीवाद करण्यासाठी प्रसिध्दी विधीतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे हे न्यायालयात दाखल झाले होते. नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज त्यांना न्यायालयात हजर करतांना रिमांड रिपोर्टमध्ये न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे युक्तीवादाची आवश्यकताच भासली नाही.
Nashik News | नाशिकच्या अंबड भागात पुन्हा बिबटयांचा वावर
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर हिरे यांच्या जामीनासाठी तात्काळ अर्ज करण्यात येईल. त्यांना जामीन मिळेल. मुळात हा गुन्हा फौजदारी स्वरुपाचा नाही. राजकीय षडयंत्र असल्याने या गुन्ह्यात त्यांना अडकविल्याचे ॲड. सरोदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हिरे यांनी जामीन अर्ज दाखल केल्याची नोटीस अद्याप सरकार पक्ष किंवा पोलिसांना मिळालेली नाही. या संदर्भात नोटीस मिळाल्यानंतर त्यांच्या जामीनाला विरोध करण्यात येईल. असे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वकील ए. आय. वासीफ यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम