Mumbai | आदित्य ठाकरेंना अटक होणार..? BMC ने केला गुन्हा दाखल

0
15

Mumbai | डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच युवसेना अध्यक्ष आदित्य ठकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.  एन एम जोशी पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यानंतर हा गुन्हा आता दाखल करण्यात आालेला आहे. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  बेकायदेशीरपणे व शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम हे अपूर्ण असतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आले. या विरोधात आता मुंबई महापालिका ही अॅक्शन मोड मध्ये आली आहे.

मालेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! तालुक्याची कन्या जिल्ह्यातील पहिली अग्निवीर जवान

डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना व साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले असताना. अशाप्रकारे उद्घाटन करणं हे बेकायदेशीर असल्याचे  महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महापालिकेने नियोजन केलेल्या उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरूही केली.

राजकीय हेतूने प्रेरित होऊन  गुन्हा दाखल 

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खा. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  बेकायदेशीर सरकार स्थापन झालेलं आहे. त्यांच्याविरोधात का गुन्हा दाखल केला जात नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल झालं आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिलेली आहे.

लोकांच्या हितासाठी निर्णय 

डिलाई रोड ब्रिजचे काम नवरात्रीपर्यंत पूर्ण करणार असे सांगण्यात आले होते. मग ते का झाल नाही? असा सवाल  सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. कोणाच्या दबावाखाली ही केस केलेली आहे हे उघड होईलच. बाळासाहेबांची शिकवण आहे. लोकांच्या हितासाठीच्या केसेस घ्या, लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही कितीही केस करा, लोकांच्या हितासाठी आम्ही कायम काम करत राहणार. असे सचिन अहिर म्हणाले आहेत.

धुळ्यात शिवमहापुराण कथेत चोरट्यांची दिवाळी; तिघांना शिताफीने अटक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here