Gram Panchayat Election Result | नाशकात दोन्ही पवारांचे खाते उघडेना

0
21

Gram Panchayat Election Result | नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील एकूण १६ पैकी ७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदाच्या २०० जागांसाठी तर ४४ थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून, आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

४४ पैकी ३ ठिकाणी ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर एका ठिकाणी अर्जच दाखल झालेला नाही. १० तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट, ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी कमालीची लढत बघायला मिळत आहे.

दरम्यान, आता स्थानिक आमदारांची म्हणजेच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, भाजप आमदार दिलीप बोरसे यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे अपडेट | कुठे ठाकरे गटाची सरशी तर कुठे शिंदे गटाला मोठा धक्का..

इगतपुरी ग्रामपंचायतीचे आतापर्यंतचे निकाल जाणून घ्या.

शिंदे गट – १

ठाकरे गट – १

अजित पवार गट –०

शरद पवार गट –०

काँग्रेस – २

मनसे – १

अपक्ष – २

असे इगतपुरी तालुक्यातील निकाल आहेत. दरम्यान, या निकालात अपक्ष उमेवारांची संख्या जास्त असून, कॉंग्रेस लाही जागा मिळालाय आहेत. इतर पक्षांना प्रत्येकी १ तर डोई राष्ट्रवादिंचे अजूनही खाते उघडेना अशी स्थिति आहे.

breaking news | देवळ्यातून पहिला निकाल हाती; बघा कोणाचे उघडले खाते


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here