Accident Update : सरलांबे येथील अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिरावतेय ; मृतांच्या वारसांना राज्य, केंद्र शासनासह संबंधित कंपनी करणार आर्थिक मदत

0
13

Accident update : शहापूर तालुक्यातील सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना 31 जुलै च्या मध्यरात्री क्रेन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात आत्तापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच काही तासातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळच्या वेळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच काळजी घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला आदेशित केल आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधत असताना सांगितले की,  सदर घटना ही अतिशय दुर्दैवी असून या ठिकाणी जवळपास 700 टनांचा लॉन्चर आणि 1250 टनांचा गर्डर आहे हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्दैवाने लॉन्चर आणि गर्डर खाली पडल्याने ही घटना घडली. यामध्ये काम करणारे अभियंते मजूर अशा एकूण वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले असून पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय या ठिकाणी एकूण 28 जण काम करत होते.

https://thepointnow.in/good-news/

या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हीएसएल या कंपनीला हे काम देण्यात आल असून या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. हा लॉन्चर आणि गर्डर नेमका कशामुळे पडला याचा सखोल तपास करण्यात येईल आणि चौकशीमध्ये जी माहिती बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल आहे.

केंद्र सरकारने घेतली दुर्घटनेची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शोक व्यक्त केला तसेच मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने देखील पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या वारसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर संबंधित ठेकेदाराने सुद्धा पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

मृतांची नावे पुढील प्रमाणे

संतोष एतंगोवान, कानन व्ही वेदारथिनम, प्रदीपकुमार रॉय, परमेश्वर खेदारुलाल यादव, राजेश भालचंद्र शर्मा, बाळाराम हरिनाथ सरकार, अरविंद उपाध्याय, नितीनसिंह विनोद सिंह,आनंद कुमार चंद्रमा यादव, लल्लन भुलेट राजभर, राधेश्याम भीम यादव, सुरेंद्रकुमार हुलक पासवान, पप्पूकुमार कृष्णदेव साव, गणेश रॉय, सुब्रतो धिरेन सरकार, लवकुशकुमार राम उदित साव, मनोज सिंह यादव, राम शंकर यादव, सत्यप्रकाश पांडे, सरोजकुमार

जखमींची नावे

सध्या या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यातील प्रेमप्रकाश आयोध्या साव यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर हिव आणि चंद्रकांत वर्मा या दोघा जखमी ना ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आल असून त्यांची देखील प्रकृती आता स्थिरावत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here