Accident News: समृद्धीवर काळाचा घाला; गर्डर कोसळून 17 जणांचा मृत्यू

0
92

Accident News: शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली असून, पुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन आणि स्लॅब कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील शहापूरजवळ गर्डर लॉन्चिंग मशीन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी एक्स्प्रेस हायवेच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामात या मशिनचा वापर केला जात होता. या अपघातात चार जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Accident News)

Five cobra : बापरे… त्यांच्या घरात आढळले तब्बल पाच कोब्रा साप ; पुढे काय घडलं?

एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर
माहिती देताना एनडीआरएफने सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एका पुलाच्या स्लॅबवर क्रेन पडल्याने एनडीआरएफच्या दोन पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने येथील मजुरांना जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत पंधरा मृतदेह आणण्यात आले आहेत. 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. मृतांव्यतिरिक्त अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब 100 फूट उंचीवरून खाली पडल्याने मोठा अपघात झाला. मृतांच्या मृतदेहांसोबतच जखमींनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Accident News)

हायवे आणि हाय-स्पीड रेल्वे ब्रिज बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रीकास्ट बॉक्स गर्डर्स बसवण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. इंडिया टुडेच्या मते, समृद्धी महामार्ग, ज्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे, हा मुंबई आणि नागपूरला जोडणारा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती मार्ग आहे. पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन अधिकारी बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत. (Accident News)

पालकमंत्री भुसे रात्री पासून घटनास्थळी

क्रेन कोसळून दुर्दैवाने 15 कामगारांचे निधन झाले आहे. सिंगापूर SN कंपनीचे हे लॉन आहे. याच लॉन च्या माध्यामतून आतापर्यंत 94 ब्रिजचे काम पूर्ण करण्यात आले. 16 स्पेन चे काम बाकी आहे. रूटीन नुसार सुरू होते. रात्री एक वाजता फोन आला. त्यानुसार आम्ही तातडीने निघालो. अपघातातील जखमींना शहापूर आणि ठाण्याच्या हॉस्पिटलला दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्या 15 लोकांचे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी पाठविण्याचे काम केले जाईल. सर्व यंत्रणा काम करत आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. शोध कार्य अजूनही सुरू आहे. ही एक तांत्रिक दुर्घटना आहे. रस्त्यावरच्या अपघाताचा आणि या अपघाताचा संबंध नाही. समृध्दी महामार्गावरील जे अपघात आहेत त्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा झालेली आहे. त्या अपघातातील जे शोध घेतले त्यात मानवी चुकांमुळे अपघात झालेले आहेत. मात्र त्या अपघातांना या सोबत जोडू नये. हा तांत्रिक अपघात असला तरी देखील याची चौकशी करण्यात येईल.

दादाजी भुसे, मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here