Abu Azmi refused to say Vande Mataram : वंदे मातरम म्हणणार नाही अशी भूमिका अबू आझमींनी घेतल्याने आज विधान भवनात मोठा गदारोळ बघायला मिळाला.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. मात्र सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य
अबू आझमी म्हणाले की, ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही. आम्ही फक्त अल्लाहला मानतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात मोठा गदारोळ केलाया आणि कामकाज तहकूब करण्यात आले.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी
संभाजीनगर जिल्ह्यातील दंगलीचा मुद्दा आझमींनी उपस्थित केला. आझमी म्हणाले की, ‘आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधत आहे. एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर संपूर्ण देशभरात मुसलमानांविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. माझ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाजाने आक्रोश रॅली काढल्या. ह्या रॅलिंमध्ये मुसलमानांना एवढं अपमानित केलं गेलं की मुसलमानांपेक्षा मोठ देशद्रोही दुसरा कुणीच नाही. “‘जब गुलिस्तां को जरुरत पडी, तो सबसे पहले गर्दन हमारी कटी, अब ये हमसे कहते थे अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नही’. २९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजता औरंगाबादमध्ये तीन व्यक्ती राममंदीराजवळ मोटरसायकलवरून आले. त्यांनी ‘इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम कहना होगा’ अशा घोषणा दिल्या होत्या.
अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म आम्हाला याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली होती. त्यावेळी पोलिसही आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं होत. पण रात्रीच्या सुमारास पुन्हा १५ ते २० जण आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर दोन्ही बाजूचे लोक जमा झाले.
त्यांनी असे वक्तव्य करताच आमदारांकडून गदारोळ
सभागृहात जोरदार गदारोळ माजला. भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यातील काही जण अध्यक्षांसमोर आले आणि त्यांनी आझमींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
https://thepointnow.in/transformer-blast-in-namami-gange-project-site/
अबू आझमी यांच्या विधानावर भाजप आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ सुरू असतानाच सभापती राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना शांत होण्याचे आवाहन केल. त्यांनी आझमी यांना इशारा देत त्यांची टिप्पणी विषयाशी अप्रासंगिक असल्याचे स्पष्ट केलं. त्यांनी सभागृहात सूचीबद्ध केलेल्या मुद्द्यावर चर्चा करावी. मात्र, विरोध सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले होते.
दरम्यान अबू आझमी यांनी थेट वंदे मातरम म्हणण्यास नकार दिल्याने आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम