Aaditya Thackeray | भुजबळ, कांदेंच्या विरोधात ठाकरेंची तोफ कडाडणार; कोणाला बळ देणार..?

0
75
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray | नाशिक :  आगामी विधानसभा निवडणुकींच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले असून, पक्षांचे बडे नेते हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे.

दरम्यान, लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावरही नाशिकला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. लोकसभेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षांना मोठे यश मिळाल्याने विशेषतः या भगात महाविकास आघाडी मोठ्या फॉममध्ये आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी नाशिकमध्ये मोठी ताकद उभी केले आहे. बुधवारी शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभी पार पडली.

Nashik Shivsena | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार जाहीर; मविआत वादाची ठिणगी..?

Aaditya Thackeray | ठाकरे गटाचा येवला आणि नांदगाववर डोळा..?

ठाकरे गटाकडून नाशिक शहरातील नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हा दोन्ही मतदार संघांवर दावा करण्यात आला असून, येथे पक्षाने एकमताने उमेदवारांच्या सुधाकर बडगुजर आणि वसंत गिते या उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर आता नाशिक ग्रामीणमध्येही नांदगाव आणि येवला मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. दरम्यान, कधीकाळी शिवसेनेत असलेले मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे या दोघांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भुजबळ आणि कांदेंच्या विरोधात उमेदवारांची चाचपणी..?

आज आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस असून, आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला (Yeola) आणि शिंदेंचे खास आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या नांदगाव (Nandgaon) या विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंची तोफ कडाडणार आहे. या दोन्ही मतदार संघांचा आदित्य ठाकरे आढावा घेणार असून, भुजबळ आणि कांदेंच्या विरोधात त्यांच्याकडून उमेदवारांची  चाचपणीही केली जाणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही ठिकाणी आदित्य ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे. त्यामुळे अजित पवारांनंतर आता आदित्य ठाकरेंनीही नाशकातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे बोलले जात आहे.

Nashik Politics | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ सात जागांवर ठाकरे गट दावा करणार..?

मिंध्यांना आगामी निवडणुकीची भीती वाटतेय 

दरम्यान, बुधवारी नाशिकमधील सभेत आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. हे घटनाबाह्य खोके आणि मिंधे सरकार हटविण्यासाठी जनता निवडणुकांची वाट बघत आहे. मात्र, मिंध्यांना आगामी निवडणुकीची फार भीती वाटत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथील महापालिकेच्या निवडणुका अजून घेतलेल्या नाही. नगरसेवकच नसल्याने महापालिकांच्या कामांचा बट्टाबोळ झाला असून, नेमेलेल्या प्रशासकांच्या माध्यमातून शहरांची फक्त लूट सुरू असल्याचे आरोप सरकारवर ठाकरे यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here