नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या कंपनीत ही आग लागली असून या आगीमध्ये अनेक कामगार अडकल्याची समोर आली आहे इतकी भीषण होती. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या कंपनीत आग लागली आहे. त्या कंपनीच्या आजूबाजूच्या 8 कंपन्या खाली करण्यात आल्या असून त्यातील कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. परिसरात धुराचे प्रचंड लोळ पसरले आहेत. ही आग आटोक्यात आली नसून भीषण रुप धारण करत असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत
MIDC फायर ब्रिगेडसहित अन्य वेगवेगळ्या ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पावणे एमआयडीसीमधील येथे ही केमिकल कंपनी असून ही आग भीषण आहे. या आगीमुळे आकाशात धूराचे लोट पसरलेले आहेत. तसेच कंपनीतील वरच्या भागात ४ ते ५ कामगार अडकले असून अग्निशामक दलाच्या जवानांकडूनत्यां ना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम