उन्हाळा झाला असून कडाक्याच्या उन्हाचा चटका प्रवाशांना बसत आहे. अशात नागरिकांना लोकल ट्रेन ने प्रवास करताना गर्मी सहन करावी लागत आहे. उन्हात प्रवाशांना दिलासा मिळाला आणि प्रवासादरम्यान नागरिकांना लोकलमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता केंद्र सरकारने येथील लोकल एसी गाड्यांच्या भाड्यात 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.
भायखळा रेल्वे स्थानकाच्या हेरिटेज इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले, मुंबईत एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली हेाती. परंतु सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटदर परवडणार नव्हता, त्यामुळे लोकलच्या प्रवाशांकडून एसी लोकलच्या तिकिटदरात कपात करण्याची मागणी हेात होती.
मुंबईतील वातानुकूलित लोकल गाड्यांचे भाडे 50 टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. दानवे म्हणाले की, 5 किमी अंतराचे किमान भाडे 65 रुपयांवरून 30 रुपये केले जाईल. मुंबईतील लोकल एसी गाड्यांचे भाडे कमी करण्याची जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती.
मध्य आणि पश्चिम रेल्वे दररोज सुमारे 80 वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा चालवते. सध्याचे भाडे किमान 20-30 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या होत्या. भाड्यातील सुधारणा केव्हा लागू होणार हे दानवे यांनी यावेळी सांगितले नाही. यावेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कार्यक्रमात उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम