राज्याच्या नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देणारे राजकीय नेते स्वतः नियम मोडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.अजित पवारांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सुनिल शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचं दिसतं आहे.
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी अजित पवार यांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. चंद्रकांत पाटलांकडे दंडाच्या रकमेची सर्वाधिक 14 हजार 200 रुपयांची थकबाकी आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना 5 हजार 200 तर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 600 रुपये दंड करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो तर वाहतूक पोलीस कारवाईदेखील केली जाते.नियमांचे नेहमी पालन करा, असे आवर्जून सांगणारे अजित पवार यांनीच वाहतुकीचे नियम मोडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यात अनेक भाजप नेत्यांचा देखील समावेश आहे. सामान्यांसह आता पोलिसांकडून मंत्री, नेत्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम